Theatres

चित्रपट गृहाची वार्षिक तपासणी योग्यता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांची यादी.

१) चित्रपट गृह संरचनात्मकदृष्ट्या मजबूत अ अग्निरोधक असल्या बाबत नोंदणी कृत वास्तुशाश्रज्ञाचे प्रमाणपत्र.

२) सिनेमा नियम १९६६ अन्वये प्रकरण – ५ नियम क्र . ७३ अनुसार चित्रपट गृहासाठी पुरविण्य आलेल्या पाण्याच्या टाक्या ह्या नियमित कालावधीसाठी व योग्य क्षमतेच्या भरून ठेवलेल्या असतात किवा कसे , तसेच सदर टाक्यांना आग विझविणे कामी उपयोगात येणारे योग्य त्या व्यासाचे नळखांब प्रमुख नळाने अ होसपाईप, जेटनोजल इ. नेजोडले असले बाबत वास्तुशाश्रज्ञाचे व अग्निशामक अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र.

३) चित्रपट गृहात पुरेशा प्रमाणात व पुरेशा क्षमतेचे आग प्रतिबंधक उपकरणे पुरविण्यात आल्याबाबत तसेच ते नुतनीकरण केल्याबाबत नोंदणीकृत खाजगी कान्त्राटदारांचे प्रमाणपत्र.

४)जिल्हा आरोग्याविभागाकडील प्रमन्पत्र.

५) महाराष्ट्र सिनेमा ( विनियम ) १९६६ च्या प्रकार्रण -४, नियम क्र . २५ ते ७२ अन्वये विद्युत विभागाकडील ना हरकात प्रत्र .

६) चित्रपट गृहास विद्युत वाहक सुस्थितित व कार्यान्वित असलेबाबत स्थानिक विद्युत कंत्राटदाराचे प्रमाणपत्र.

७) चित्रपट गृहास पुरविण्यात आलेल्या दूरध्वनी कार्यान्वित असलेबाबत दूरध्वनी विभागाचे प्रमाणपत्र.

८) निरीक्षण शुल्क जमा केले बाबत चलनाची प्रत ( सदर चलनावर शुल्क जमा केलेल्याची तारीख व क्रमांक स्पष्टपणे दिसेल अश्या स्वरूपाचे असावे )

९) प्रमाणित केलेल्या आसन व्यवस्था दर्शविणारा नकाशा.

१०) चित्रपट गृहास पुरविण्यात आलेले बहि:त्सर्जक पंखे पुरेशा प्रमाणात व कायम स्वरूपी कार्यान्वित असल्याबाबत स्थानिक नोंदणीकृत विद्युत कंत्राट दाराचे प्रमाणपत्र.